चंद्रपूर :- दिनांक :- २९ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला असून, काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंद राहणार
कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सौ. वसुमाना पंत यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेसना दिनांक २९ जुलै २०२६ रोजी एकदिवसीय सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन व मदत कक्ष
हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
आपत्कालीन किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या ☎️ ०१७१२-२५००७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.




