वरोरा :-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी, वरोरा येथे ‘युवा कुंभ २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “युवा शक्ती – राष्ट्र शक्ती” हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित हा कार्यक्रम १६ ते ३५ वयोगटातील तरुणांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
🙏‘काय आहे ‘युवा कुंभ’🙏
केवळ एक कार्यक्रम नसून, हा तरुणांसाठी विचारांचे व्यासपीठ आहे. बदलत्या काळात तरुणांची भूमिका काय असावी, देशाला महासत्ता बनवण्यासाठी युवकांनी कसे योगदान द्यावे, याचा सखोल ऊहापोह येथे होणार आहे.
👉 कार्यक्रमाची मुख्य आकर्षणे.
💥 परिसंवाद :- राष्ट्रनिर्मिती आणि युवकांचे योगदान यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
💥 प्रेरणादायी व्याख्याने :- यशस्वी व्यक्तिमत्त्वांचे अनुभव कथन.
💥 नेटवर्किंग :- समान विचारसरणीच्या तरुणांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी.
💥 विविध उपक्रम :- क्रीडा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून शारीरिक व वैचारिक शक्तीचे प्रदर्शन.
🙏 कार्यक्रमाची माहिती 🙏
💠 दिनांक :- रविवार, १९ जुलै २०२६
💠 वेळ :- सकाळी १०:०० वाजल्यापासून
⭕ स्थळ ⭕ शेतकरी भवन, सीडीसीसी (CDCC) बँकेजवळ, सद्भावना चौक, वरोरा.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व युवकांसाठी अल्पोपहार आणि जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
💠 नोंदणी करण्याचे आवाहन 💠
देश आणि समाजाच्या जडणघडणीत योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणाने या ‘युवा कुंभ’मध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवाचा भाग होण्यासाठी खालील लिंकवर त्वरित नोंदणी करा.
👉 नोंदणी लिंक :-👇👇👇👇👇👇👇👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfQgbmaGmfAzyVJ_r0ns0p6L2h5I1y86_eI0JsDUMvAjIZ0Rw/viewform?usp=header
युवकांनो, चला तर मग, राष्ट्रनिर्मितीच्या या महायज्ञात सहभागी होऊया आणि ‘युवा शक्ती’चा हुंकार दाखवून देऊया!




