Home Breaking News यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठा आर्थिक घोटाळा; चौकशीचे आदेश !

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठा आर्थिक घोटाळा; चौकशीचे आदेश !

यवतमाळ :- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर घोटाळ्याची दखल घेत आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष लेखी परीक्षणातून (Special Audit) हा गैरव्यवहार उघडकीस आला असून, अमरावती विभागीय सहनिबंधकांनी या प्रकरणातील पुढील कारवाईसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या मोठ्या घोटाळ्यामुळे बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.