Home क्राईम पोलीस प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केली पित्याची हत्या तीन वर्षानंतर उघडकीस आली घटना,...

पोलीस प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केली पित्याची हत्या तीन वर्षानंतर उघडकीस आली घटना, चौघांना अटक

 

चंद्रपूर  :- पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर तब्बल ३ वर्षांनी प्रकरणाचा खुलासा झाला. मृतक पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी चंद्रपूर पोलीस विभागात पोलीस कर्मचारी तर आरोपी जावयाला पोलीस ट्रेनिंग दरम्यान सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, मृतक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने मुलीने विष देऊन पित्याची हत्या केली. २५ एप्रिल २०२३ ला जयंत बाल्लावार (४५) यांचा ड्युटीवर असतांना जिल्हाधीकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता, मात्र तेव्हा मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही, मात्र ३ दिवसांपूर्वी मृतकाचा जावई आशिष शेडमाके याने पोलीसात आपल्या सर्व गुन्ह्याची कबुली देत आपली पत्नी आर्या बाल्लावार हिने वडिलांना विष देऊन मारल्याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जयंत बाल्लावार यांना ड्युटीवर जाण्यापूर्वी आर्याने मिल्कशेक मध्ये विष टाकून पिण्यासाठी दिले, मिल्कशेक पिल्यावर जयंत बाल्लावार हे ड्युटी वर प्रशासकीय भवन मध्ये गेले असता त्यांचा मृत्यू झाला, २०२२ पासून प्रेमसंबंधात असलेल्या आर्या आणि आशिष यांच्या प्रेमाला जयंत बाल्लावार यांचा विरोध होता. त्यामुळे आर्याने आपला मावसभाऊ चैतन्य गेडाम (२२) याच्याकडून ५ हजार रुपयांना विष विकत घेतले. वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांनी लग्न केलं, मात्र लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले, त्यातच बेशिस्त वर्तनामुळे आशिष शेडमाके ला ट्रेनिंग दरम्यान बडतर्फ करण्यात आलं, तर ट्रेनिंग नंतर आर्या बाल्लावार सासरी न येता माहेरी गेल्याने संतापलेल्या आशिष शेडमाके ने पूर्ण प्रकरण उघडकीस आणलं, रामनगर पोलिसांनी या प्रकरणात महिला पोलीस अंमलदार आर्या बाल्लावार सह आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि विष विकत देणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ राजा करीत आहे.

🙏 जय विदर्भ  🙏