महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात बुधवारी सकाळी निधन झाले. या विमान अपघाताचा घटनाक्रम समोर आला आहे.
पुणे: बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर शोककळा परसली आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेपूर्वीच्या घटनाक्रमाची माहिती सरकारने दिली आहे.
मेडे कॉल नाही
नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पायलटची पहिली लँडिंग अयशस्वी झाली. 8.43 वाजता रनवे 11 वर लँडिंग करण्याची परवानगी दिली. त्यानंतर पायलटकडून कोणताही रीडबॅक आला नाही. या संपूर्ण घटनेत विमानाने ‘मेडे’ कॉल दिला नाही किंवा कोणतीही आपत्कालीन सूचना एटीसीला दिली नाही असे निवदेनात म्हटले आहे.
एटीसीच्या अधिकाऱ्यानुसार, एकंदर घटनाक्रम असा होता.
बुधवारी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा प्लेन VI-SSK ने बारामतीशी संपर्क साधला.
विमान बारामतीपासून 30 नॉटिकल मैल अंतरावर असल्याची माहिती दिली. पायलटला विवेक बुद्धीनुसार दृश्यमान आणि हवामान परिस्थितीनुसार लँडिंग करण्याचा सल्ला दिला गेला.
हवेची दिशा आणि दृश्यमानतेबद्दल विचारले असता, हवा शांत असल्याचे आणि दृश्यमानता सुमारे 3,000 मीटर असल्याचे सांगण्यात आले.
विमानाने रनवे 11 वर फायनल अप्रोचची माहिती दिली. परंतु क्रूने रनवे दिसत नसल्याचे सांगितले.त्यांनी पहिल्या प्रयत्नात गो-अराउंड केले. गो-अराउंडनंतर, क्रूने पुन्हा रनवे 11 वर फायनल अप्रोच असल्याची माहिती दिली.
क्रूने सांगितले की, आता रनवे दिसत नाहीये, दिसल्यावर कळवू. काही सेकंदांनंतर क्रूने रनवे दिसल्याचे सांगितले.
सकाळी 8.43 वाजता विमानाला रनवे 11 वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, क्रूने लँडिंग क्लिअरन्सचा रीडबॅक दिला नाही.
सकाळी 8.44 वाजता, एटीसीने रनवे 11 च्या थ्रेशोल्डजवळ आगीच्या ज्वाळा पाहिल्या. तातडीने आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. विमानाचा ढिगारा रनवे 11 च्या थ्रेशोल्डच्या डावीकडे आढळला.
या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, , फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांचा मृत्यू झाला.🙏जय विदर्भ 🙏 बातमी व जाहीराती साठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732




