वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
जयपूर येथे दि. १९ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत फ्रीस्टाईल फूमसे प्रकारात सहा कांस्यपदके पटकावली. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उजळून निघाला आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत आनंद निकेतनच्या खेळाडूंनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणाऱ्या भारतीय संघाच्या निवड चाचणीस पात्रता मिळवली. विशेष म्हणजे, फ्रीस्टाईल फूमसे प्रकारात पदक व निवड मिळवणारे विदर्भातील हे पहिलेच खेळाडू ठरले असून, महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत हे यश ऐतिहासिक ठरले आहे.
कांस्यपदक विजेते खेळाडू:
हृतिक मेश्राम, कृष्णा दैवलकर, काशिश कुमरे, तनुजा पाईघन, आचल आत्राम आणि समीक्षा सावसाकडे — हे सर्व खेळाडू महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत आहेत.
खेळाडूंना सातत्यपूर्ण मार्गदर्शन देणारे प्रशिक्षक (माजी सैनिक) बजरंग वानखेडे, तसेच शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तानाजी बायस्कर व सचिन साळुंखे यांच्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, विश्वस्त कौस्तुभ आमटे व पल्लवी आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करत आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
🙏जय विदर्भ🙏
बातमी व जाहिराती करती संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




