Home Breaking News Mumbai News : कमला मिल टाइम्स टॉवरला भीषण आग

Mumbai News : कमला मिल टाइम्स टॉवरला भीषण आग

Mumbai News : कमला मिल टाइम्स टॉवरला भीषण आग
mumbai-news-kamala-mill-times-tower-fire

अशा घटना घडत असल्याचा मनसेचा आरोप

मुंबई (Mumbai) :- उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाइम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. मुंबईतील लोअर परळ पश्चिमेकडील टाइम्स टॉवर इमारतीला शुक्रवारी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल परिसरात असलेल्या टाइम्स टॉवरला आज सकाळी भीषण आग लागली. ही घटना 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6.29 वाजता घडली. अग्निशमन दलाने तत्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी 9 गाड्या आणि जवान तैनात केले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याची माहिती सर्वप्रथम बीएमसीच्या मुंबई अग्निशमन विभागाने दिली होती. आग ‘लेवल-1’ म्हणून घोषित करण्यात आली होती, मात्र काही मिनिटांतच ती ‘लेवल-2’ पर्यंत वाढल्याचे जाहीर करण्यात आले. आगीचा भडका इतका मोठा होता की, संपूर्ण इमारत आगीच्या लपेटात आल्याने धुराचे लोट आकाशात झेपावले होते.

Mumbai map
Mumbai City
Mumbai population
Mumbai district Name
Mumbai University
Mumbai neighborhoods
Where is Mumbai located in India
Mumbai University Login