28 November 2026News Website

वरोऱ्याच्या मातीत कबड्डीचा रणसंग्राम १८ ते २० डिसेंबर रोजी अखिल भारतीय स्पर्धा

वरोरा :- स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर स्मृती प्रित्यर्थ, जय हिंद मंडळ, वरोरा यांच्या वतीने भव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. १८, १९ व २० डिसेंबर २०२६ रोजी जुने कॉटन मार्केट ग्राउंडवर रंगणाऱ्या या थरारक सामन्यांमध्ये देशभरातून तगडे खेळाडू मैदानात उतरणार आहेत.

 💥तगडी बक्षिसे आणि अटीतटीची लढत💥

या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये जिंकण्यासाठी संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे:

👉 पुरुष गट :- प्रथम पुरस्कार ₹ ३,००,००१/-, द्वितीय पुरस्कार ₹ २,००,००१/- आणि तृतीय पुरस्कार ₹ १,००,००१/- ठेवण्यात आला आहे.

👉 महिला गट :- प्रथम पुरस्कार ₹ १,५०,००१/-, द्वितीय पुरस्कार ₹ १,००,००१/- आणि तृतीय पुरस्कार ₹ ५०,००१/- देण्यात येणार आहे.

👉 वैयक्तिक पुरस्कार :- उत्कृष्ट रेडर, उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट अष्टपैलू (ऑलराऊंडर) खेळाडूंसाठी प्रत्येकी ₹ ११,१११/- चे विशेष बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

 🙏आयोजक आणि संपर्क माहिती 🙏

जुने कॉटन मार्केट ग्राउंड, वरोरा येथे होणाऱ्या या महासंग्रामासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी काशिफ खान ☎️ (७७५७८६३६३६), सुरेंद्र मत्ते ☎️ (९३५६०६८९०५), जय हिंद क्रीडा मंडळ अध्यक्ष प्रवीण काकडे, गणेश गहुकर ☎️ (७७०९३८९०३४) आणि राहुल घाटे ☎️ (९६८९५०२५९७) यांच्याशी संपर्क साधता येईल.

अभिषेक किशोर भागडे