7 November 2026News Website

फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट्स अकॅडमी वरोराची विद्यार्थिनी सानिया राजेश आवारी ची राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी!

वरोरा :- दिनांक २ नोव्हेंबर २०२६ ते ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामधील आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट्स अकॅडमी वरोराची विद्यार्थिनी सानिया राजेश आवारी हिने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत द्वितीय स्थान पटकावून रौप्य पदक प्राप्त केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे वरोरा शहराचे नाव राज्यस्तरावर गौरविले आहे.



सानिया हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. तिच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक शिहान विनय बोढे, मुख्य प्रशिक्षक सेन्सई रवी चरुरकर व सेम्पाई घनश्याम खोंडे, सेम्पाई फकिरा निखाडे, सेम्पाई अश्विनी नरड, सेम्पाई – शोन दसुडे तसेच अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर (माजी सैनिक व (BJP) नगरसेवक), दिगंबर खापणे (माजी सैनिक), रवी तुराणकर (माजी सैनिक), हेमराज बेहरे (मराठा रेजिमेंट माजी सैनिक), बजरंग वानखडे (तायक्वांदो सचिव

अभिषेक किशोर भागडे