7 November 2026News Website

वरोऱ्याच्या संजना संजय राय हिची शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी.एअरबॉर्न तायक्वांदो अकॅडमी, वरोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

वरोरा :- एअरबॉर्न तायक्वांदो अकॅडमी, वरोरा येथील होतकरू खेळाडू कु. संजना संजय राय हिने शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावून वरोरा शहराचा नावलौकिक वाढविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे एअरबॉर्न तायक्वांदो अकॅडमीसह संपूर्ण वरोरा शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



संजना हिने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या, चिकाटीच्या आणि नियमित सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल एअरबॉर्न तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष श्री. अमन टेमुर्डे, उपाध्यक्ष श्री. सुरेश बोबाटे (माजी सैनिक), सचिव श्री. सागर गणपतराव कोहळे (माजी सैनिक), कोषाध्यक्ष श्री. सचिन बोधाने, सहसचिव तथा प्रशिक्षक श्री. आकाश भोयर (ब्लॅक बेल्ट), प्रशिक्षक श्री. अक्षय हनवते (ब्लॅक बेल्ट) तसेच संघटनेचे श्री. ऋषी मडावी सर, श्री. प्रकाश चिकटे (माजी सैनिक), श्री. दिनेश ठाकरे (माजी सैनिक) यांनी संजना हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.



तसेच या यशाबद्दल श्री. दिव्या नंदनवार, श्री. संतोष थेरे (माजी सैनिक), श्री. पंकज चौधरी, श्री. महेंद्र जीवतोडे (माजी सैनिक), श्री. अशोक वर्माजी, सौ. हर्षदा कोहळे, श्री. ईश्वर रोडे, श्री. जीवन काकडे, श्री. शुभम दुर्वे, श्री. सचिन निखाडे आणि श्री. प्रदीप माकडे यांनीही संजना हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.याशिवाय वरोरा शहरातील सर्व नागरिक, क्रीडाप्रेमी, शाळेतील शिक्षकवृंद, पदाधिकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



संजना हिने यापुढेही अशाच प्रकारे उत्तुंग यश संपादन करून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वरोरा शहराचे नाव उज्ज्वल करावे, तसेच भविष्यात सुवर्णपदक प्राप्त करून देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशा शुभेच्छा एअरबॉर्न तायक्वांदो अकॅडमीचे सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक आणि हितचिंतकांनी व्यक्त केल्या आहेत.”संजना हिचे हे यश वरोरा शहरातील इतर होतकरू खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!”

अभिषेक किशोर भागडे