पुणे :- भीमाशंकर अभयारण्यात एका कंपनीच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडिया व विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत. मात्र, या सर्व केवळ अफवा असून भीमाशंकर अभयारण्यात कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नसल्याचे स्पष्टीकरण वनविभातर्फե देण्यात आले आहे.
- वृक्षतोडीच्या चर्चांना पूर्णविराम :- मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रकल्पांतर्गत वृक्षतोडीच्या दाव्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही.
- प्रशासनाचे आवाहन :- नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच याबाबतची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक (वन्यजीव), पुणे यांच्या कार्यालयाकडून (केशव ज. वाबळे, भा.व.से.) करण्यात आले आहे.





