6 November 2026News Website

माजरी पोलिसांची धडक कारवाई! राळेगाव -पाटळा मार्गावर ४ गोवंश जनावरांसह बोलेरो पिकअप जप्त ३ तस्कर जाळ्यात

  • पोलीस स्टेशन :- माजरी, जि. चंद्रपूर
  • गुन्हा नोंद क्रमांक :- १६९/२०२६

चंद्रपूर :- माजरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बजरंग दल वरोरा. राळेगाव ते पाटळा मार्गावर विनापरवाना व अत्यंत क्रूरपणे कोंबून नेल्या जाणाऱ्या ४ गोवंश जनावरांसह एक महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन आणि इतर मुद्देमाल असा एकूण ७,८६,००० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध गंभीर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💥 घटनाक्रम व सापळा कारवाई 💥

दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे २२:२० वाजताच्या सुमारास, माजरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राळेगाव ते पाटळा रस्त्यावरून एका पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची चोरटी वाहतूक केली जात आहे. या मिळालेल्या माहितीच्या आधारे माजरी पोलिसांनी राळेगाव -पाटाळा शेत शिवारातील जंगलात सापळा रचला.

दरम्यान, MH-29-BE-9722 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी तिथून जात असताना पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शिताफीने वाहन अडवले.

💥 अमानुषपणे कोंबलेले होते गोवंश 💥

गाडीची झडती घेतली असता, पिकअपच्या मागील भागात ४ गोवंश जनावरे (गोरे) अत्यंत क्रूरपणे, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आणि दोरीने पाय व तोंड घट्ट बांधून कोंबल्याचे निदर्शनास आले. वाहनचालक व त्याच्या सहकाऱ्यांकडे गोवंश वाहतूक संदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे किंवा परवाना मागितला असता, ते कोनते ही कागदपत्र सादर करू शकले नाहीत.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹ ७,८६,०००)

  • ४ गोवंश जनावरे (गोरे ) :-  किंमत अंदाजे ₹ ६०,००० (प्रत्येकी १५,००० प्रमाणे)
  • महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH-29-BE-9722) :- किंमत ₹ ७,००,०००
  • १ एप्पल १३ प्रो मोबाईल फोन :- किंमत ₹ २५,०००
  • १ काळ्या रंगाचा मोबाईल :- किंमत ₹ १,०००

 💥 अटक करण्यात आलेले आरोपी 💥

  1. जय प्रमोद देठे (वय २१ वर्षे, रा. नायगाव, ता. वणी, जि. यवतमाळ)
  2. रामकिसन उर्फ रामकृष्ण मारोती भट (वय ४६ वर्षे, रा. पटवारी कॉलनी, लालगुळा, वणी, जि. यवतमाळ)
  3. अनुराग देवानंद कामटकर (वय १९ वर्षे, रा. नाळापूर, ता. वणी, जि. यवतमाळ)

🙏 मार्गदर्शन व तपास पथक 🙏

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , संतोष बकाल  उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस स्टेशनचे ठानेदार सुबोध वंजारी यांच्या आदेशानुसार , पोलीस हवालदार हरिदास चोपणे, एकनाथ बोरकुटे पोलीस, धनराज पचोरडिया पोलीस ओमेज उईके व पोलीस चेतन मडावी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

अभिषेक किशोर भागडे