7 November 2026News Website

‘जनसेवा हेच ध्येय, जनतेचे हित हाच संकल्प!’

मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही आणि सावलीकरांच्या सेवेत चार सुसज्ज रुग्णवाहिका समर्पित!

विशेष वृत्त / प्रतिनिधी :- आरोग्यदायी समाज आणि सक्षम भारत घडवण्याच्या दिशेने आणखी एक ध्येयवादी पाऊल टाकत, मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही आणि सावली या चार तालुक्यांतील नागरिकांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका समर्पित करण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत एका-एका सेकंदाला खूप महत्त्व असते. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकदा रुग्णांचे हाल होतात. हीच अडचण ओळखून, “राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असते” हा ठाम विश्वास जपत विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही आणि सावली या चारही भागांत रुग्णवाहिका जनसेवेत दाखल केल्या आहेत.

उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये व उद्देश

  • वेळेवर वैद्यकीय मदत :- आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे.
  • जीव वाचवण्याचा प्रयत्न :- गरजू रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे आणि त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू करणे.
  • नागरिकांना मोठा दिलासा :- या चार सुसज्ज रुग्णवाहिकांमुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना, गरिबांना आणि दुर्गम भागातील लोकांना खूप मोठा आधार मिळणार आहे.
  • सुरक्षिततेची हमी :-  नागरिकांचे आरोग्य, त्यांची सुरक्षितता आणि अडचणीच्या काळात त्यांना मदतीचा हात देणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे.

“जनतेची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. संकटाच्या आणि अडचणीच्या काळात प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे.”  मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार

जनसेवेचा हा महायज्ञ असाच अविरत सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कौतुकास्पद उपक्रमामुळे संपूर्ण परिसरातून विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अभिषेक किशोर भागडे