28 November 2026News Website

वरोऱ्यात संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

वरोरा :- वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था, वरोरा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.



भारतीय संविधानाच्या मूल्यांचे स्मरण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच विविध समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संविधानाच्या रक्षणासाठी व समतावादी मूल्यांच्या जतनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.

अभिषेक किशोर भागडे