वरोरा दि २७ नोव्हेंबर :-नागपूर महामार्गावर आनंदवन चौक व रत्नमाला चौकात वाहतूक सिग्नलसाठी सातत्याने पाठपुरावा करून सिग्नल लावल्याबद्दल वरोरावासीयांच्या वतीने माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांचा रत्नमाला चौकात सत्कार करण्यात आला.नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष योगिता नेरकर, शिवसेना (शिंदे गट)जिल्हाप्रमुख नितीन मते, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. निशी सैनानी, राष्ट्रवादी (अ प) विधानसभा प्रमुख विलास नेरकर, शिवसेना (ऊबाठा) जिल्हा संघटक मनीष जेठानी, काँग्रेस नेते प्रवीण काकडे, नगरपालिकेचे गटनेते गजानन मेश्राम, सभापती गजानन जिवतोडे, जागृती फाऊंडेशनचे प्रवीण धनवलकर, काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत खापणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चिकटे, शहराध्यक्ष निलेश भालेराव, शिवसेनेचे राजू महाजन, सामाजिक कार्यकर्ते आशिष ठाकरे ,शकील पटेल, जयंत ठमके,नगरसेवक बंडू देऊळकर अभय ठावरी, फिरोज पठाण,अतुल वानखेडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी महामार्गावर वाहतूक सिग्नलची नितांत गरज होती, याकरिता विलास टिपले यांनी केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना सिग्नल साठी 2022 पासून केलेल्या पाठपुरावायचा लेखाजोखा माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी मांडला. कार्यक्रमास विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी,नगरसेवक, पत्रकार बंधू व इतर नागरिक उपस्थित होते.





