चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच एमआयएमच्या वतीने टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली. महापालिकेत अधिकृत कार्यक्रम घेण्यास महापौरांनी स्पष्ट नकार दिल्यानंतरही पक्षाचे एकमेव नगरसेवक अझर शेख यांच्या नेतृत्वात थेट प्रवेशद्वारावरच हा कार्यक्रम पार पाडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.अझर शेख यांनी चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर यांच्याकडे महानगरपालिकेत टिपू सुलतान जयंती साजरी करण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या महापुरुषांच्या अधिकृत यादीत टिपू सुलतान यांचा समावेश नसल्याचे कारण देत महापौरांनी या मागणीला नकार दिला.महापौरांच्या या भूमिकेनंतरही माघार न घेता अझर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रपूर मनपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन करत जयंती साजरी केली. प्रशासनाच्या नकारानंतर घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.