7 November 2026News Website

वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील ३५ जिल्हा परिषद शाळा होणार डिजिटल आमदार करणदादा देवतळे यांच्या पुढाकारातून ८० लाखांचे ई-लर्निंग संच उपलब्ध!

वरोरा :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या महत्त्वपूर्ण उद्देशाने वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील ३५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आमदार मा. करणदादा देवतळे यांच्या पुढाकारातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीअंतर्गत तब्बल ८० लाख रुपयांचे ई-लर्निंग संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.



या कौतुकास्पद आणि दूरगामी उपक्रमाबद्दल ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक, तालुका शाखा भद्रावती व वरोरा’ यांच्या वतीने आमदार करणदादा देवतळे यांचा सत्कार करून विशेष आभार मानण्यात आले.या प्रसंगी बोलताना आमदार करण देवतळे यांनी, वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी आपण यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे ठाम आश्वासन दिले. अशा डिजिटल शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत.



या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे विभाग कार्यवाह विलास बोबडे, जिल्हाध्यक्ष अमोल देठे, जिल्हा कार्यवाह विलास खाडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पांडे, जिल्हा प्रतिनिधी सतीश डांगरे, वरोरा तालुकाध्यक्ष सचीन जांभुळे यांच्यासह विकास तुरारे, रमेश वाकडे, सचित जांभुळे, दिगंबर खुळसंगे, रंगनाथ मत्ते, प्रशांत कोल्हे, संदीप गराटे, नितेश भोवारे, विलास मेश्राम, सागर कनोजवार, सदाशिव पाल, मनोज नन्नावरे, नितीन नन्नावरे, बाबाराव वाकडे, संजय बुरुले आणि अतुल झोटिंग यांच्यासह अनेक शिक्षक परिषद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिषेक किशोर भागडे