6 November 2026News Website

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांचे विसरता कामा नये; शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना चंद्रपुरात विनम्र अभिवादन!

आर्णी-केळापूरचे आ. राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली; आदिवासी कृती समिती व स्मारक समितीचा संयुक्त उपक्रम

चंद्रपूर (प्रतिनिधी) :- “देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मातीसाठी प्राणांची आहुती देणारे आद्य क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचा लढा, अतुलनीय शौर्य आणि त्याग आजच्या तरुण पिढीसाठी आणि संपूर्ण समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा जोपासत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल,” असा ठणठणीत संदेश आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्राचे आक्रमक आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी दिला.

क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक समिती आणि आदिवासी कृती समिती, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष श्रद्धांजली व प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. राजूभाऊ तोडसाम यांनी क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शहीदांच्या बलिदानाचा विसर पडू देऊ नका!

या प्रबोधन मेळाव्यात बोलताना उपस्थितांनी क्रांतीवीरांच्या संघर्षमय जीवनाचा व इतिहासाचा पुनरुच्चार केला. ब्रिटिशांच्या विरोधात विदर्भाच्या मातीत आरंभीच्या काळात पेटवलेला स्वातंत्र्याचा वणवा आणि आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी दिलेला लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. अशा थोर महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून समाजात जनजागृती निर्माण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम चंद्रपुरात राबवण्यात आला.

🙏 कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये 🙏

  • आयोजक :- क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक समिती व आदिवासी कृती समिती, चंद्रपूर.
  • प्रमुख उपस्थिती व अभिवादन :- आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रमुख हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण.
  • मुख्य संदेश :- क्रांतीवीरांच्या विचारांचा वारसा जपत समाजाच्या प्रगतीसाठी संघर्षशील राहण्याचा संकल्प.

या कार्यक्रमास आदिवासी समाजबांधव, विविध राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अभिषेक किशोर भागडे