वरोरा/भद्रावती (विशेष प्रतिनिधी) :- स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल श्री. रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनाचे आणि शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भद्रावती येथील शिंदे महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेला ‘माँ का जगराता’ सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. माता दुर्गेच्या भक्तीत तल्लीन झालेल्या या सोहळ्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांसह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय हस्त्या! ‘बजरंगी भाईजान’ फेम हर्षाली मल्होत्रा (मुन्नी), अभिनेत्री नेहा पेंडसे आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका ईशरत जहाँ यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले. ईशरत जहाँ यांच्या भक्तीगीतांच्या सुरावलींवर भाविक मंत्रमुग्ध झाले.
सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ: पौर्णिमा आईलवार हिला मदत
शैक्षणिक प्रगतीला मदतीचा हात! धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करतानाच ट्रस्टने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम योजनेअंतर्गत बी.ए.एम.एस. (BAMS) चे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बेलगाव (ता. भद्रावती) येथील गरजू व होतकरू विद्यार्थिनी कु. पौर्णिमा महेंद्र आईलवार हिला पुढील शिक्षणासाठी ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. ट्रस्टच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा शिस्तबद्ध ताफा
कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी विशेष उपस्थिती लावून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
याशिवाय, माजी आमदार वामनराव चटप, आमदार देवराव भोंगळे, आमदार मनीषाताई कायंदे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, शिवसेना नेते किरणजी पांडव, मोझरीचे माजी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, माजी आमदार अविनाशजी वाजुरकर, बँकेचे मानस सचिव आवेश खान पठाण, युवा मोर्चा उपाध्यक्ष रघुवीर अहिर, चंद्रपूर जि. प. माजी अध्यक्ष सतीशजी वाजूरकर, ॲड. पुरुषोत्तमजी सातपुते, भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, भाजप नेते रमेशजी राजूरकर, बाजार समिती सभापती राजू डोंगे, उपसभापती जयंतजी टेंभुर्डे, सौ. वेदांतीताई देवतळे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
🙏पोलीस प्रशासनाचे आभार🙏
अथांग जनसागराच्या उपस्थितीत कायदा, सुव्यवस्था आणि वाहतूक नियोजन सुरळीत ठेवल्याबद्दल आयोजकांच्या वतीने पोलीस विभागाचे विशेष आभार मानण्यात आले. शारदीय नवरात्रोत्सव व आगामी सणांच्या शुभेच्छा देत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.





