चिमूर :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) चिमूर आगाराच्या ताफ्यात नव्याने ५ अत्याधुनिक बसेस दाखल झाल्या आहेत. चिमूर बसस्थानक परिसरात आयोजित दिमाखदार सोहळ्यात या नव्या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या गाड्यांमुळे मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होणार आहे.
स्थानिक बसस्थानकाच्या विकासावर भर देताना आ. बंटीभाऊ भांगडिया यांनी सांगितले की, चिमूर येथे आधीच अत्याधुनिक सुविधांनी युक्त बसस्थानक उपलब्ध असून, आगामी काळात प्रवाशांच्या गरजेनुसार आणखी नव्या सुविधा जोडल्या जातील. तसेच, आगारातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकार्पण सोहळ्यातील प्रमुख उपस्थिती
महत्त्वाची उपस्थिती :- नगराध्यक्षा सौ. गिताताई लिंगायत, श्री. राजुभाऊ देवतळे, श्री. मनिष तुमपल्लीवार, श्री. घनश्यामभाऊ डुकरे, डॉ. दिपकजी यावले, श्री. भिमरावजी ठावरी, श्री. प्रविण सातपुते, श्री. एकनाथजी थुटे सर, श्री. योगेश ठुणे, श्री. ओमप्रकाश गणोरकर, श्री. निलमभाऊ राचलावर, श्री. दिगांबर भेंडे, श्री. बंटीभाऊ वनकर, श्री. बालू पिसे, श्री. नैनेश पटेल.
परिवहन विभाग व प्रशासकीय अधिकारी :- श्री. इम्रान शेख (वाहतूक निरीक्षक), श्री. सुरज मुन (वाहतूक नियंत्रक), श्री. राहुल पेटकर (सहाय्यक वाहतूक नियंत्रक), श्री. सतिश पोईनकर (प्रभारक), श्री. खेमराज सातपुते, श्री. प्रितेश कापरकर, श्री. रविकांत सिडाम, श्री. गजानन पुल्लरवार, श्री. धांडे (वाहतूक नियंत्रक).
व्यापक सहभाग :- शहरातील बहुसंख्येने उपस्थित भाजपा पदाधिकारी, परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी, कार्यकर्ते, नागरिक आणि शालेय विद्यार्थी.
या सर्वसमावेशक सोहळ्यामुळे चिमूर आगाराच्या परिवहनसेवेला नवी गती मिळाली असून प्रवाशांमधून तीव्र समाधान व्यक्त होत आहे.




