6 November 2026News Website

भारत शिक्षण संस्था, वरोरा व हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ९० वर्षपूर्ती महोत्सव उत्साहात संपन्न

वरोरा (प्रतिनिधी) :- ज्ञान, संस्कार आणि यशाची गौरवशाली परंपरा असलेल्या येथील ऐतिहासिक भारत शिक्षण संस्था, वरोरा व हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ९० वर्षपूर्ती महोत्सव अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे, भूतकाळात या पवित्र भूमीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे चरणस्पर्श लाभले होते, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.



९० वर्षांच्या या गौरवशाली प्रवासात या संस्थेने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेमार्फत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्यात उच्च नैतिक मूल्ये रुजवण्याचे काम या संस्थेने सातत्याने केले आहे.



गुणवंत विद्यार्थ्यांची निर्मिती :- गेल्या ९० वर्षांत या शिक्षण संस्थेने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले असून, येथील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, राजकारण व सामाजिक क्षेत्रात या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असून संस्थेचे व वरोरा शहराचे नाव रोशन केले आहे.

“ज्ञान, संस्कार आणि यशाची गौरवशाली परंपरा – ९० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास” या ब्रीदवाक्याला साजेसे असे कार्य या संस्थेने केले असून, भविष्यातही हा शैक्षणिक व सामाजिक वसा असाच पुढे चालवला जाईल, अशी ग्वाही संस्थेच्या वतीने देण्यात आली. या ९० वर्षपूर्ती महोत्सवामुळे वरोरा शहरात आनंदी व अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.बारूला दुर्गा उत्सव मंडळाचे सामाजिक कार्य :- रॅलीच्या स्वागतासाठी व सहभागी विद्यार्थी-नागरिकांच्या सेवेसाठी ‘बारूला दुर्गा उत्सव मंडळ, दत्त मंदिर वार्ड’ यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची तसेच बिस्किट व चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले, ज्याचे सर्वत्र कौतुक झाले.

अभिषेक किशोर भागडे