Home जिल्हा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा भव्य पक्ष सोहळा व मशाल...

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा भव्य पक्ष सोहळा व मशाल गर्जना: वरोऱ्यात राजकीय वातावरण तापणार!

वरोरा :- आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे एका भव्य पक्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आक्रमक राजकीय शक्तीप्रदर्शनामुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा रंगली असून विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक :- २ सप्टेंबर २०२६, बुधवार,वेळ :-दुपारी ११ वाजता.स्थळ :-जलाराम भवन,रेल्वे बोर्गाजवळ, बोर्ड चौक, वरोरा.जि. चंद्रपूर



🙏 प्रमुख मान-मान्यवरांची उपस्थिती 🙏
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- श्री. प्रशांत दादा कदम (जिल्हा संपर्क प्रमुख, चंद्रपूर) प्रमुख उपस्थिती :- श्री. संदीप भाऊ गिरहे (चंद्रपूर जिल्हा प्रमुख – चंद्रपूर, बल्लारशाह, राजुरा विधानसभा) आणि श्री. भास्कर भाऊ ताजने (चंद्रपूर जिल्हा प्रमुख – वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी विधानसभा) विशेष उपस्थिती :- श्री. दिलीपीजी कदम (मुंबई – माजी खासदार व शिवसेना नेते), श्री. अमित भारतराव निब्रड (उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर – वरोरा भद्रावती विधानसभा), श्री. बंडुजी डाखरे सर (वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख), श्री. विपिन वि काकडे (तालुका प्रमुख वरोरा), श्री. नरेश भाऊ काळे (तालुका प्रमुख भद्रावती), श्री. अतुल भाऊ नांदे (शहर प्रमुख वरोरा), आणि श्री. बंटी भाऊ हेमके (शहर प्रमुख भद्रावती)

श्री. आशिष संजय रणदिवे (शिवसैनिक, वरोरा) आणि वरोरा-भद्रावती तालुक्यातील सर्व शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडी व शिवसेना प्रणित सर्व आघाड्यांचे शिवसैनिक.
या भव्य पक्ष सोहळ्याला परिसरातील लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, वरोऱ्याच्या भूमीवर निष्ठावंतांच्या साक्षीने “मशाल” अधिक तेजत करण्याचा हा ज्वलंत संकल्प असणार आहे!