भद्रावती :- घोडपेठ येथे हिरकणी महिला प्रभाग संघाचे वार्षिक अधिवेशनात उत्तम कामगिरी करणाऱ्या समूह, उत्पादक गट व ग्राम ग्राम संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती भद्रावती अंतर्गत कोंढा घोडपेठ प्रभागाच्या हिरकणी महिला प्रभाग संघाचे वार्षिक अधिवेशन नुकतेच किसान भवन घोडपेठ येथे संपन्न झाले.
प्रभाग संघाचा वार्षिक जमा खर्च व अहवाल सर्व समूहातील महिलांना सादर करणे व मंजुरी घेणे, पुढील वार्षिक नियोजन सादर करून मंजुरी घेणे इत्यादीसाठी दरवर्षी वार्षिक अधिवेशन घेतले जाते. सन २०२५-२६ चे वार्षिक अधिवेशन दिनाक 30 /९/२०२६ रोजी प्रभाग संघ अध्यक्ष शोभा शीतल बहादे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. त्यावेळी मंचावर प्रामुख्याने प्रभाग संघ सचिव वर्षां संजय खारकर , कोषाध्यक्ष रेखा बालकी , तालुका अभियान व्यवस्थापक मा.अरुण चौधरी सर , घोडपेठ ग्रामपंचायत चे प्रशासक मा. अनिल खडके , महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मा. प्राजक्ता वानखेडे मॅडम ,CDCC बँक चे सुनील जुनघरे सर,वैद्यकीय विभागातील कृपा चक्रनारायण मॅडम,रजनी खोब्रागडे मॅडम तालुका व्यवस्थापक,प्रभाग समन्वयक दिनेश उईके सर ,अरविंद तांदुळकर , ब्लॉक अँकर सानिका कोंडेकर, इत्यादी मंचावर उपस्थित होते.
अधिवेशनाचे प्रास्ताविक प्रभाग समन्वयक अरविंद तांदुळकर यांनी केले. प्रभाग संघाचा वार्षिक जमाखर्च लिपिका ममता असुटकर यांनी सादर केला.
सादर केलेल्या जमा खर्चा बाबत उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे शंका समाधान पदाधिकारी यांनी केले. प्रभाग संघाचा वार्षिक अहवाल व कार्य नियोजन प्रभाग संघ व्यवस्थापक रंजू मत्ते यांनी सादर केले. याप्रसंगी प्रभागातील चेक तिरवंजा या गावातील श्री साई समूह, चालबर्डी रै येथील श्रमिक उत्पादक गट व चपराळा येथील निधी ग्रामसंघाचा प्रभाग संघाचे वतीने सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते गौरव केला . प्रभाग संघाअंतर्गत व्यवसाय ,उद्योग सुरू करून चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळवित असलेल्या वैयक्तिक व सामूहिक उपजीविका यशोगाथा तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच वैद्यकीय विभागातर्फे HB तपासणी कॅम्प महिलांकारिता घेण्यात आला.
उपस्थित महिलांना प्रभाग संघ अध्यक्ष शोभा शीतल बहादे प्रभाग संघ सचिव वर्षां खारकर तसेच प्रभाग संघ कोषाध्यक्ष रेखा बल्की यांनी अभियाना अंतर्गत सर्व उपक्रमात सर्व ग्राम संघांनी सक्रिय सहभाग घेऊन उद्दिष्ट पूर्ती साठी सहकार्य करावे असे आवाहन केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्राजक्ता मॅडम यांनी PMFME, CMEGP योजनेबाबत माहिती दिली.CDCC बँक सुनील सर यांनी यांनी समूह नियमित असल्याबाबत त्यांचे कौतुक केले.उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी सर यांनी उमेद अभियाना कडून मिळालेला सर्व निधीचा निकषाप्रमाणे वाटप व परतफेड, बँक कर्ज व विविध विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन वैयक्तिक व सामूहिक उद्योग व्यवसाय, एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्प व उपक्रम, वॉटर कप स्पर्धा इत्यादीचा लाभ घेऊन प्रत्येक कुटुंबाची उपजीविका शाश्वत करावी याविषयी मार्गदर्शन केले.
संचालन उमंग ग्राम संघ लिपिका निशा विधाते यांनी केले तर आभार प्रभाग व्यवस्थापाक रंजू मत्ते यांनी मानले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी प्रभाग संघ पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. अधिवेशनासाठी प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





