7 November 2026News Website

शिक्षण व वर्ग संचालकांच्या हक्कासाठी विदर्भाचा बुलंद आवाज गजाबजणार!

मा. नंदकिशोर खिरटकर यांची ‘कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ॲण्ड सोशल फोरम, महाराष्ट्र’च्या राज्य प्रतिनिधी (विदर्भ विभाग) पदी दमदार वर्णी

वरोरा / चंद्रपूर :- कोचिंग क्लासेस आणि शिक्षण क्षेत्रात अहोरात्र कष्ट घेऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणारे, तसेच शिक्षक व वर्ग संचालकांच्या हक्कासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारे वरोरा येथील मा. नंदकिशोर कं. खिरटकर (अभिरुची कोचिंग क्लासेस, वरोरा) यांची ‘कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ॲण्ड सोशल फोरम, महाराष्ट्र’ या राज्यस्तरीय संघटनेच्या राज्य प्रतिनिधी (विदर्भ विभाग) पदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे विदर्भातील शिक्षण वर्तुळात आनंदाची व उत्साहाची लाट पसरली आहे.

💥 संघर्षशील आणि कर्तृत्ववान नेतृत्वाचा सन्मान 💥

मा. नंदकिशोर खिरटकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोचिंग क्लासेस व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कोचिंग क्लासेस व्यावसायिकांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्याचा दांडगा अनुभव, संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुणांचा सन्मान करत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची धुरा सोपवली आहे.

💥 जून २०२९ पर्यंत असणार कार्यकाळ💥 ही नियुक्ती जून २०२९ पर्यंत असणार असून, या कालावधीत संघटनेची ध्येय-धोरणे, घटनात्मक मूल्ये व शिस्त यांचा सन्मान राखून, सर्व पदाधिकारी, शिक्षक, क्लासेस संचालक व सभासदांना सोबत घेऊन संवाद, समन्वय आणि सहकार्याच्या माध्यमातून विदर्भात संघटना अधिक आक्रमक, सक्षम व व्यापक करण्यासाठी ते कटीबद्ध राहणार आहेत.

“पद हे मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नसते, तर पदाला मोठेपणा मिळवून देण्यासाठी असते!”

ही उच्च आणि प्रेरणादायी कार्यभावना मनाशी बाळगून मा. नंदकिशोर खिरटकर विदर्भातील शैक्षणिक व सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी निष्ठेने, पारदर्शकतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करतील, असा ठाम विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

या पॉवरफुल आणि दणदणीत नियुक्तीबद्दल मा. नंदकिशोर खिरटकर यांच्यावर राज्यभरातून अभिनव शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या या आगामी शैक्षणिक व संघटनात्मक वाटचालीस व विदर्भवासीयांच्या हिθरक्षणासाठीच्या लढ्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत!

अभिषेक किशोर भागडे