7 November 2026News Website

वरोऱ्यात खळबळ! GMR कंपनीमागे सापडलेल्या मृतदेहाची पटली ओळख; मृत बबन दामू परचाके असल्याचे निष्पन्न

 

वरोरा :- दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी येथील GMR कंपनीच्या परिसरात आढळून आलेल्या अज्ञात मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले आहे. आज दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी मयत व्यक्तीच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली असून, सदर मृत व्यक्ती बबन दामू परचाके (रा. ज्योतिबा फुले वार्ड.वरोरा) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय ? १९ सप्टेंबर रोजी वरोऱ्यातील GMR कंपनीच्या मागच्या नाल्यात  एका इसमाचा लावारिस मृतदेह संशयास्पद स्थितीत निदर्शनास आला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. मृतदेह कुजण्याच्या व बेवारस स्थितीत असल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर आज (२१ सप्टेंबर) मृतकाच्या भावाने उपजिल्हा रुग्णालय वरोरा या  ठिकाणी येऊन मृतदेहाची खात्री पटवली, ज्यामध्ये मृत व्यक्ती बबन दामू परचाके असल्याचे स्पष्ट झाले.

पोलीस प्रशासनाची धडक कारवाई सुरू सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणाचा कसून व सखोल तपास एपीआय (API) लक्ष्मी चौधरी व त्यांची विशेष टीम करत असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

 

अभिषेक किशोर भागडे