Home जिल्हा बोपापूर (ता) येथे बैल पोळा व तान्हा पोळा आनंदात संपन्न

बोपापूर (ता) येथे बैल पोळा व तान्हा पोळा आनंदात संपन्न

बोपापूर ( ता) : पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि ग्रामीण परंपरेला चालना देण्याच्या उद्देशाने पोळा उत्सव समिती, बोपापूर (ता) यांच्या वतीने बैल पोळा व तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.



बैल पोळा स्पर्धा दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या स्पर्धेत गावचे पोलिस पाटिल प्रतिक हिरादेवे यांचे कडुन प्रथम पारितोषिक पांडुरंग नामदेव कुत्तरमारे यांना , तर द्वितीय पारितोषिक शिव छत्रपती युवा क्रीडा मंडळ बोपापुर (ता) यांच्याकडून अशोक पंढरी कुत्तरमारे यांना देण्यात आले
तसेच तान्हा पोळा स्पर्धा दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात आली. यामध्ये प्रथम पारितोषिक पूर्वी आशिष कौरासे, द्वितीय पारितोषिक आराध्या पराग ढोके, तृतीय पारितोषिक क्रियांश अतुल माथनकर, तर चतुर्थ पारितोषिक हर्षल स्वप्नील हिरादेवे यांना प्राप्त झाले.



तान्हा पोळा स्पर्धेत नंदीबैलाची सजावट व वेशभूषा या निकषांवरून परीक्षण करण्यात आले. स्पर्धेमुळे बालकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, पोळा सणाच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृती आणि ग्रामीण जीवनमूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पोळा उत्सव समिती, पोलिस पाटिल प्रतिक हिरादेवे ,शिव छत्रपती युवा क्रीडा मंडळ , हनुमान देवस्थान कमिटी. बोपापुर (ता) तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आणि अशाप्रकारे उत्सव सोहळा आनंदात संपन्न झाला.