Home जिल्हा आमदार करणदादा संजय देवतळे यांच्यावतीने “आमचा बाप्पा, आमची सजावट” घरगुती गणपती सजावट...

आमदार करणदादा संजय देवतळे यांच्यावतीने “आमचा बाप्पा, आमची सजावट” घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६ चे आयोजन.

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :- गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वावर नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमदार करण संजय देवतळे यांच्याकडून एका नाविन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त “आमचा बाप्पा, आमची सजावट” या विशेष घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरच्या बाप्पाची सजावट आणि आरास संपूर्ण मतदारसंघासमोर दाखविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहनपर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत, ज्यामुळे नागरिकांचा व कलाकारांचा उत्साह अधिक वाढणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त पर्यावरणपूरक, पारंपरिक किंवा नाविन्यपूर्ण सजावट करणाऱ्या सर्वसामान्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.



💥 स्पर्धेत सहभागी कसे व्हावे 💥
या स्पर्धेत भाग घेणे अत्यंत सोपे असून नागरिकांनी खालीलप्रमाणे माहिती पाठवणे अनिवार्य आहे:
💥 आपल्या घरच्या गणपती सजावटीचा १ स्पष्ट फोटो.
💥 बाप्पांसोबत कुटुंबाचा १ फोटो.
💥 स्पर्धकाचे पूर्ण नाव.
💥 संपर्क करण्यासाठी चालू मोबाईल नंबर.
ही संपूर्ण माहिती ☎️ ८९२३३३०८८८ या WhatsApp क्रमांकावर पाठवून नागरिक आपल्या कुटुंबासह या स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतात.



🙏 महत्त्वाच्या नोंदी व दिनांक :- या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २२ सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या सजावटीचे व कुटुंबाचे फोटो वरील क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या घरच्या बाप्पाची देखणी सजावट सर्वांपर्यंत पोहोचवा आणि आमदार करणदादा संजय देवतळे यांच्या या अभिनव स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आकर्षक बक्षिसांचा लाभ घ्या, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.