Home जिल्हा एकल व विधवा गरजू महिलांच्या स्वावलंबनासाठी ‘उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थे’चा प्रेरणादायी उपक्रम;...

एकल व विधवा गरजू महिलांच्या स्वावलंबनासाठी ‘उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थे’चा प्रेरणादायी उपक्रम; ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा दणक्यात शुभारंभ!

चंद्रपूर :- महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला आणि त्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्था’ नेहमीच अग्रेसर राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर, संस्थेच्या वतीने एकल, विधवा व गरजू महिलांसाठी मोफत किंवा रोजगाराभिमुख ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा दिमाखदार शुभारंभ शुक्रवार, दिनांक :-१८ जुलै २०२६ रोजी पार पडला.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. छबूताई वैरागडे यांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे प्रेरणादायी उद्घाटन करण्यात आले. हा महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण वर्ग चंद्रपूरमधील जठपुरा वॉर्ड, रामनगर रोड येथील सौ. स्नेहा पोटदुखे यांच्या पार्लरमध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी महिलांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.



🙏स्वावलंबनाचे नवे पर्व आणि विविध उपक्रम 🙏
केवळ ब्युटी पार्लरच नव्हे, तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थे’च्या माध्यमातून विविध कौशल्याधारित उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
👉 ब्युटी पार्लर प्रशिक्षण.
👉 शिवणकाम प्रशिक्षण.
👉 कम्प्युटर प्रशिक्षण.



🙏मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण. 🙏
अशा विविध रोजगाराभिमुख उपक्रमांचा लाभ गरजू व होतकरू महिलांना घेता येत असून, महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे मोठे सामाजिक कार्य या संस्थेमार्फत केले जात आहे.



🙏 महिला वर्गात उत्साहाचे वातावरण 🙏
या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील एकल व गरजू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा रोजगाराची नवीन दारे खुली होणार आहेत. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल चंद्रपूर शहरातून आणि समाजघटकांमधून सौ. छबूताई वैरागडे व संपूर्ण उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थेच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.