Home जिल्हा वरोरा येथे होणार ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे भावपूर्ण मुखोदगत पारायण; भाविकांना भक्तीमय...

वरोरा येथे होणार ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे भावपूर्ण मुखोदगत पारायण; भाविकांना भक्तीमय सोहळ्याचे आमंत्रण

वरोरा :- भक्ती आणि श्रद्धेचा एक अलौकिक सोहळा वरोरा नगरीत आयोजित करण्यात आला आहे. श्री दासगणू महाराज लिखित पवित्र ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे मुखोदगत पारायण सोहळा येथे पार पडणार असून, हा कार्यक्रम भाविकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.




मधुर वाणीतून  साक्षात दर्शन
या पारायणाची विशेष खासियत म्हणजे, हे पारायण सौ. विद्याताई विलास पडवळ (ठाणे) यांच्या मधुर वाणीतून संपन्न होणार आहे. त्यांच्या वाचनातून श्री गजानन महाराजांच्या लीला आणि त्या काळातील प्रसंग डोळ्यासमोर हुबेहूब जिवंत होतात. हे श्रवण करणे म्हणजे साक्षात महाराजांच्या सानिध्यात रमण्यासारखा अनुभव असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.




👉 कार्यक्रमाची रूपरेषा :-
💠 दिनांक :- मंगळवार, ३० जून २०२६
💠 वेळ :- सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
💠 स्थळ :- वानखडे सेलिब्रेशन, वणी बायपास रोड, वरोरा. त. वरोरा. जि. चंद्रपूर




🙏 आयोजकांचे आवाहन 🙏
या भक्तीमय सोहळ्याचे आयोजन सौ. हर्षाली मंगेश वानखडे आणि श्री. मंगेश रामदासजी वानखडे यांच्यावतीने करण्यात आले आहे. सर्व भाविक भक्तांनी या पारायणाचा लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.




👉  विशेष सूचना 🙏
पारायणास येताना भाविकांनी सोबत आपला ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ आवर्जून आणावा. तसेच, महिला भाविकांना लाल रंगाची साडी परिधान करून येण्याची विनंती करण्यात आली आहे.