Home Breaking News वादळी वाऱ्यासह पावसाचा एकोना गावात तडाखा

वादळी वाऱ्यासह पावसाचा एकोना गावात तडाखा

वरोरा :- निसर्गाच्या लहरीपणामुळे मोलमजुरी करणारी जनता पुन्हा एकदा हतबल झाले आहे. वरोरा तालुक्यातील एकोना गावात आज झालेल्या जोरदार वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून,  शेतमजुरांचे व मोलमजुरी करणाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने एकोना गावाला जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत गावातील काही घरांचे छप्पर उडाले असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने:
श्रीमती कलावती बळीराम भडके (रा. एकोना) यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
एकनाथ कचरू पोईंनकर (रा. एकोना) यांच्या ही घराचे व मालमत्तेचेही या नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थ पूर्णपणे हतबल झाले आहेत. ऐन हंगामाच्या काळात निसर्गाच्या या अवकृपेमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
एकीकडे महागाई आणि दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे पूर्ण करावेत आणि पीडित शेतकरी व ग्रामस्थांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी एकोना ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.