वरोरा :- स्मार्ट मीटर हे डिजिटल व दूरस्थ पद्धतीने (Remote) वीज वापर मोजणारे मीटर आहे. यात वीज वापराची माहिती थेट वीज वितरण कंपनीकडे पोहोचते. मीटर रीडरची गरज कमी होते आणि रिअल-टाईम वापर पाहता येतो.
✅ स्मार्ट मीटरचे फायदे
✔ अचूक बिलिंग होण्यास मदत
✔ मीटर रीडिंगसाठी कर्मचारी येण्याची गरज नाही
✔ मोबाईलवर वीज वापराची माहिती मिळू शकते
✔ वीज चोरी शोधणे सोपे होते
✔ बिलातील मानवी चुका कमी होतात
✔ तक्रारींचे निवारण जलद होऊ शकते
👉 स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या शंका व संभाव्य तोटे
❖ काही ग्राहकांच्या मते बिल वाढल्याच्या तक्रारी येतात.
❖ नेटवर्क किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास अडचणी येऊ शकतात.
❖ प्रीपेड पद्धती लागू झाल्यास आधी पैसे भरावे लागू शकतात.
❖ डेटा गोपनीयतेबाबत काही ग्राहक चिंता व्यक्त करतात.
❖ जुने मीटर बदलताना पुरेशी माहिती दिली जात नाही अशी तक्रार आढळते.
महाराष्ट्रात स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक आहे का?
भारत सरकारच्या Revamped Distribution Sector Scheme (RDSS) अंतर्गत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे.
मात्र, ग्राहकाला कोणत्याही बदलाबाबत स्पष्ट माहिती देणे, सुरक्षा नियम पाळणे व ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे.
स्मार्ट मीटर न लावल्यास वीज कापू शकतात का?
वीज पुरवठा खंडित करण्यासाठी विद्युत अधिनियम 2003 कलम 56 नुसार विशिष्ट प्रक्रिया आवश्यक आहे.
✔ थकबाकी असल्यास नोटीस देणे आवश्यक.
✔ केवळ स्मार्ट मीटर संदर्भातील मतभेद असल्यास कायदेशीर प्रक्रिया पाळणे आवश्यक.
✔ ग्राहकांनी लेखी हरकत व स्पष्टीकरण मागू शकतात.
48 तासांत मीटर बदला असा संदेश आल्यास काय करावे?*
📌 घाबरू नका.
संदेशाची प्रत जतन करा.
स्थानिक महावितरण कार्यालयाकडे लेखी माहिती मागा.
मीटर बदलाचा आदेश, नियम व कारण विचारावे.
अर्जाची पोच घ्यावी.
तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी.
ग्राहकांना निवडीचा अधिकार आहे का ?
👇
ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 नुसार ग्राहकांना माहिती मिळण्याचा अधिकार,
निवडीचा अधिकार
आणि तक्रार निवारणाचा अधिकार आहे.
ग्राहकांचे प्रमुख अधिकार
👇
✔ सुरक्षिततेचा अधिकार
✔ माहिती मिळण्याचा अधिकार
✔ निवडीचा अधिकार
✔ ऐकून घेण्याचा अधिकार
✔ तक्रार निवारणाचा अधिकार
✔ ग्राहक शिक्षणाचा अधिकार
ग्राहकांनी काय करावे ?
✅ स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी माहितीपत्रक मागा.
✅ जुन्या मीटरचा अंतिम रीडिंग फोटो काढा.
✅ मीटर बदलताना व्हिडिओ/फोटो ठेवा.
✅ पहिले काही महिने बिलांची तुलना करा.
✅ चुकीचे बिल वाटल्यास त्वरित लेखी हरकत द्या.
✅ सर्व कागदपत्रे व मेसेज जतन करून ठेवा.
ग्राहक जागृती संदेश
“स्मार्ट मीटर असो वा सामान्य मीटर, ग्राहकाने माहिती घेणे, बिल तपासणे आणि आपल्या अधिकारांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.




