भांडारपालांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनदरबारी लढा तीव्र करण्याचा निर्धार; नूतन राज्य कार्यकारिणी जाहीर !
छत्रपती संभाजीनगर :-सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभाग महाराष्ट्र राज्य भांडार संघटनेचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक ०२ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात संपूर्ण राज्यातून आलेल्या भांडारपालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एकजूट दाखवत हुंकार भरला असून, आगामी काळात शासनदरबारी आक्रमक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
🙏विवेक झटे यांच्या अध्यक्षतेखाली मंथन🙏
संघटनेचे मावळते सचिव मा. श्री. विवेक झटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अधिवेशनात भांडारपाल पदाच्या विविध समस्यांवर आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भांडारपालांच्या न्याय्य हक्कांसाठी एक सविस्तर प्रस्ताव तयार करून तो तातडीने शासन दरबारी सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.
👉 नूतन राज्य कार्यकारिणी: अनुभवाची आणि संघर्षाची जोड.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सर्वसहमतीने संघटनेची नवीन राज्य कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अत्यंत अनुभवी आणि लढाऊ नेतृत्वाकडे संघटनेची धुरा सोपवण्यात आली आहे:
👉 राज्यअध्यक्ष :-श्री. गणेश अशोकराव कवडे पाटील (अहिल्यानगर)
(माजी अध्यक्ष, अहिल्यानगर पाटबंधारे व सा.बां. खाते कर्मचारी सहकारी पतसंस्था)
👉 राज्य सचिव :-श्री.सुरेश देवराव बोभाटे (चंद्रपूर)
(निवृत्त भारतीय सैनिक – माजी सैनिक प्रवर्ग, कार्यकारी अभियंता कार्यालय, चंद्रपूर)
👉 सहसचिव :- 1. श्री.तुळशीराम वाघमारे (नांदेड)
2. श्रीमती वैशाली मुनेश्वर (नागपूर)
3.कोषाध्यक्ष :-श्री.अभिजित घोडेराव (नाशिक)
🛑 मार्गदर्शक आणि सल्लागार समिती 🛑
संघटनेला योग्य दिशा देण्यासाठी सल्लागार म्हणून श्री. विवेक झटे (अमरावती), श्री. सचिन मस्के (नाशिक) आणि श्री. कमलप्रकाश पाईकराव (छत्रपती संभाजीनगर) यांची निवड करण्यात आली आहे.
🔴 नियोजनबद्ध आयोजन आणि विराट उपस्थिती 🔴
या अधिवेशनाचे नेटके आणि उत्कृष्ट आयोजन श्री. सचिन मस्के यांनी केले होते, तर सभेचे सूत्रसंचालन श्री. कमलप्रकाश पाईकराव यांनी आपल्या धारदार शैलीत केले. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून भांडारपाल आणि सहाय्यक भांडारपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने हे अधिवेशन म्हणजे एक शक्तिप्रदर्शनच ठरले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. नूतन कार्यकारिणी निवडल्यानंतर बोलताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “भांडारपाल संवर्गावर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा थांबणार नाही!”
🙏🙏सुरेश देवराव बोभाटे🙏🙏
सचिव, महाराष्ट्र राज्य भांडारशाखा संघटना.
🙏 जय विदर्भ 🙏




