घाटंजी :-महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सुपुनाथ मंगल कार्यालय, मुरली (ता. घाटंजी) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ आणि भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाले. आमदार मा. प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
या विशेष शिबिराला परिसरातील नागरिकांची अभूतपूर्व व विक्रमी उपस्थिती लाभली. हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.
एकाच छताखाली शासकीय सेवा व समस्यांचे निवारण
या शिबिरामध्ये महसूल, आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच विविध महत्त्वाच्या शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांच्या विविध समस्या, अर्ज व तक्रारींचे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत तत्पर व प्रभावी निराकरण करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त करण्यात आले.
रक्तदान शिबिराला व सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.
भव्य रक्तदान शिबिर :- शिबिरादरम्यान आयोजित रक्तदान शिबिरात परिसरातील तरुणांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
मान्यवरांचा सन्मान :-समाजकारणात आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिसरातील मान्यवरांचा यावेळी विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
🙏 कृतज्ञता व आभार प्रदर्शन 🙏
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) साहेब, आर्णी, घाटंजी व पांढरकवडा येथील तहसीलदार, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, आयोजक, रक्तदाते, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित सर्व नागरिक यांचे आमदार मा. प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
“जनतेच्या दारी शासनाच्या योजना, प्रत्येक नागरिकाच्या समस्येचे त्वरित निराकरण आणि लोकहितासाठी अखंड जनसेवा हीच आमची बांधिलकी!”




