Home जिल्हा संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धे चा समारंभ उत्साहात...

संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धे चा समारंभ उत्साहात संपन्न; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव!

वरोरा:-  दि. ३ ऑगस्ट २०२६ क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ख्याती असलेल्या संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे आयोजित सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महामुकाबल्यात उत्कृष्ट कौशल्य दाखवून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी धडक मारलेल्या प्रतिभावान खेळाडूंना मेडल आणि ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले.



🙏प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती 🙏
या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांची विशेष उपस्थिती लाभली होती:
श्री. ओमप्रकाश सोनटक्के (ठाणेदार, वरोरा पोलीस स्टेशन)
श्री. नितीनजी मते व श्री. प्रवीणजी मालू
डॉ. दुरई, ज्योती हंकारे, मुकुंद झाला, अतुल जाट (सीबीएसई ऑब्झर्व्हर टीम)
सौ. राणी पटेल (प्राचार्या, संस्कार भारती पब्लिक स्कूल)
सौ. श्रद्धा चौबे (उपप्राचार्या)



🙏 तांत्रिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान 🙏
स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी विविध राज्यांतून आलेल्या पंचांचे, सीबीएसई ऑब्झर्व्हर टीमचे आणि अधिकृत तांत्रिक कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच, शाळेच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या अविरत परिश्रमांची पावती देण्यात आली.



🙏 प्रेरणादायी मार्गदर्शन आणि सदिच्छा 🙏
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विजयी खेळाडूंना पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. कठीण परिश्रमातूनच यश मिळते, हा कानमंत्र देत मान्यवरांनी खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
शाळेच्या या भव्य आयोजनामुळे केवळ खेळाडूंचाच नव्हे, तर संपूर्ण वरोरा शहराचा क्रीडाजगत उजळून निघाला असून, संस्कार भारती पब्लिक स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा विभागाने विशेष परिश्रम घेतले.