Home विदर्भ मा. नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात नैसर्गिक शेतीला नवी दिशा; ‘शेतातून थेट...

मा. नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात नैसर्गिक शेतीला नवी दिशा; ‘शेतातून थेट ग्राहकांपर्यंत’ संकल्पनेवर भर

नागपूर, दि. 1 ऑगस्ट 2026 :- मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीविषयक भव्य कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत कृषी उद्योजक नरेंद्र जिवतोडे यांनी शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित करत ‘शेतातून थेट ग्राहकांपर्यंत’ या संकल्पनेवर प्रभावी भूमिका मांडली.



यावेळी हॉटेल रेडिसन परिसरात सुमारे ८,००० चौरस फुटांची नैसर्गिक शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून ‘विदर्भ नैसर्गिक शेतमाल संघ’ स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला. हा निर्णय विदर्भातील नैसर्गिक शेतीसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.



यावेळी श्री. नरेंद्र जिवतोडे म्हणाले, “जोपर्यंत नैसर्गिक शेती ते ग्राहक ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळणार नाही. शेतकऱ्याला उत्पादनाबरोबरच बाजारपेठेची हमी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.”
पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “मा. नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरसारख्या शहरात नैसर्गिक शेतमालासाठी कायमस्वरूपी दालन उभारण्याचा निर्णय हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, योग्य मोबदला आणि नैसर्गिक शेती करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल.”



या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. नैसर्गिक शेती, मूल्यवर्धन आणि थेट ग्राहक संकल्पना राबवून विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न बहुगुणीत करण्याचा दृढ निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.