वणी (प्रतिनिधी) :-
बोर्डा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवार, २२ एप्रिल रोजी पुकारण्यात आलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर यशस्वीरित्या मागे घेण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाने मागण्यांची दखल घेत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मनसे नेते सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाने व तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या सहकार्याने बोर्डा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर लक्ष्मण उपरे, प्रतीक पानघाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाद्वारे गावातील रस्ते दुरुस्ती व नूतनीकरण, सांडपाण्याचे व्यवस्थापन व नाली बांधकाम संबंधित विभागाने आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांच्या सर्व मागण्या रास्त असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. प्रशासनाच्या या भूमिकेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. “गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आमचा लढा असाच सुरू राहील, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. या उपोषणात विभाग अध्यक्ष लक्ष्मण निखिल अस्वले दिनेश डोंगे मारुती ढेंगळे राहुल देवतडे राजू थाटे ईश्वर पायघन संजय बोधाने व ग्रामस्थ उपस्थित होते.
🙏 जय विदर्भ 🙏




