वरोरा :-अभिषेक किशोरराव भागडे
वरोरा नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मधील संत गाडगेबाबा प्रभागातील मारवाडी स्मशानभूमीत सोयीसुविधांची वानवा दिसून येत आहे. येथे प्रकाशयोजनेचा अभाव, बसण्यासाठी बाकांची अनुपलब्धता आणि अस्वच्छता यांसारख्या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष (भाजप) श्री. संतोष सुरेश पवार यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
💥 काय आहेत प्रमुख समस्या ?
👉 प्रकाशयोजनेचा अभाव :- स्मशानभूमीत हायमास्ट लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी किंवा अन्य कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो.
👉 बैठक व्यवस्थेची कमतरता :-स्मशानभूमीत बसण्यासाठी बाक (बेंचेस) उपलब्ध नसल्याने नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय होते.
👉 अस्वच्छता :-स्मशानभूमी परिसरात स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असून, त्वरित स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व समस्यांची दखल घेऊन, मारवाडी स्मशानभूमीत हायमास्ट लाईट बसवावे, आवश्यक त्या ठिकाणी बाके (बेंचेस) उपलब्ध करून द्यावीत आणि संपूर्ण परिसराची तातडीने स्वच्छता करावी, अशी आग्रही मागणी श्री. संतोष पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
🙏 जय विदर्भ🙏




