Home जिल्हा लोकनेते माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य निःशुल्क सर्व रोगनिदान,...

लोकनेते माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य निःशुल्क सर्व रोगनिदान, रक्तदान शिबीर व आयुष्मान कार्ड वितरण सोहळा

वरोरा :- लोकनेते माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य निःशुल्क सर्व रोगनिदान, रक्तदान शिबीर व आयुष्मान कार्ड वितरण सोहळा.महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री, लोकनेते स्व. संजयजी देवतळे हे मनमिळावू, विचारवंत आणि समाजासाठी अखंड झटणारे व्यक्तिमत्व होते. गोरगरीब, वंचित आणि गरजू बांधवांसाठी त्यांनी आयुष्यभर रुग्णसेवा उपलब्ध करून दिली. त्यांचा हा सेवाभाव जपण्यासाठी व त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

👉 या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्यसेवा उपलब्ध :-
▶ मधुमेह (डायबिटीज), रक्तदाब व हृदयरोग तपासणी व उपचार
▶ स्तन, गर्भाशय व मुख कर्करोग निदान व उपचार
▶ मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया
▶ हर्निया, हायड्रोशियल व शरीरावरील गाठी तपासणी
▶ अस्थिरोग तपासणी
▶ ईसीजी व इतर रक्त तपासण्या
▶ आयुष्मान कार्ड वितरण ( ₹५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण )

🗓️ दिनांक : २५ एप्रिल २०२६
📍 स्थळ : उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वरोरा (ता. वरोरा, जि. चंद्रपूर)
⏰ व: सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत

⭕ आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा व स्व. संजयजी देवतळे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करावी, ही नम्र विनंती ⭕

🙏 विनीत : श्री. करणदादा संजय देवतळे, आमदार (वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र)🙏
आयोजक : स्व. संजय देवतळे मित्र परिवार व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वरोरा. त. वरोरा, जि. चंद्रपूर

🙏 जय विदर्भ 🙏