वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीकडे ओढा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या कार्यशैलीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर विवेक रणदिवे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला.
आमदार करण देवतळे यांच्या ‘पुष्पांजली’ या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी आमदारांनी विवेक रणदिवे व त्यांच्या समर्थकांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी निर्णय
प्रवेशावेळी बोलताना विवेक रणदिवे म्हणाले की, “आमदार करणदादा देवतळे यांनी अत्यंत कमी वेळात वरोरा-भद्रावती मतदारसंघात विकासाची कामे मार्गी लावली आहेत. त्यांच्या जनसंपर्कामुळे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीमुळे प्रभावित होऊन, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.”
दिग्गज नेत्यांची उपस्थिती 👇
या सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
गणेश भिवदरे भाजपा गटनेते तथा नगरसेवक, नगरपरिषद वरोरा.शंभुनाथ वरघने ( स्वीकृत सदस्य ) तथा ज्येष्ठ नेते, भाजप.विजय मोकाशी ज्येष्ठ नेते, भाजप.याव्यतिरिक्त भाजपचे इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवेक रणदिवे यांच्या प्रवेशामुळे वरोरा परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




