वरोरा :- वरोरा- वनोजा गावाजवळ एका अज्ञात ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला असून, त्याचा सोबती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री ९:०० वाजताच्या सुमारास घडला. “सदर माहिती ही तोंडीरिपोर्ट द्वारे आहे ”
🛑नेमकी घटना काय 🛑
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक चेतन किसनराव चावरे (वय ३६ वर्ष, रा. खैरी, ता. राळेगाव) हा त्याचा मित्र संदेश बुरडकर (वय ३५ वर्ष) याच्यासह आपल्या मोटारसायकलने (क्रमांक: MH 36 D 5653) वरोरा येथून खैरीकडे जात होता. वनोजा गावाजवळ पोहोचले असता, माढळीकडून वरोऱ्याकडे अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
🛑 जागीच झाला मृत्यू 🛑
धडक इतकी भीषण होती की, चेतन चावरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे धाव घेतली, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात संदेश बुरडकर हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.👇या कलमान्वये गुन्हा दाखल 👇
याप्रकरणी मृताचे मेहुणे विजय रामाजी क्षीरसागर (वय ४३, रा. दहेगाव) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम: २८१, १२५(ब)
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम: १०६(१)
“अज्ञात ट्रक चालकाने हलगर्जीपणाने आणि भरधाव वेगाने वाहन चालवून या अपघाताला निमंत्रण दिले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.”
🙏 जय विदर्भ 🙏




