वरोरा : – अभिषेक किशोर भागडे
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कु.अदिती गायकवाड हिने CBSE १० वीच्या परीक्षेत संपूर्ण तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. अदितीच्या या देदीप्यमान यशाची दखल घेत वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. करणदादा देवतळे यांनी तिचा आणि तिच्या पालकांचा विशेष सत्कार करून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.
यशाने वरोरा तालुका भारावला CBSE बोर्डाच्या परीक्षेत अदितीने मिळवलेले यश हे केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, संपूर्ण वरोरा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. संस्कार भारती स्कूलने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा दर्जा सिद्ध केला असून, तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवून अदितीने इतर विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
👉 दिग्गजांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा
या यशोशिखराची दखल घेत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याला आमदार करणदादा देवतळे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अदितीच्या यशाचे कौतुक करतानाच तिच्या पालकांनी घेतलेल्या कष्टांचाही गौरव केला. यावेळी शाळेच्या प्राचार्या मा. राणी पटेल , उपप्राचार्या मा. श्रद्धा चौबे , तसेच संतोष पवार ,विनोद काकडे , अमोल आवारी आणि शाळेचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रशासनाला आणि शैक्षणिक क्षेत्राला सकारात्मक संदेश अदितीच्या या यशामुळे वरोरा तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. “योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत असेल तर वरोऱ्याचे विद्यार्थी कोणत्याही स्तरावर चमकू शकतात,” असा ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
अदिती गायकवाडच्या या यशाबद्दल तिचे आणि संस्कार भारती पब्लिक स्कूलचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या पुढील वाटचालीस आमदार महोदयांसह सर्व मान्यवरांनी उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.
🙏 जय विदर्भ 🙏




