वरोरा :-: अभिषेक किशोर भागडे
महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असताना, त्यांनी वरोरा – भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. करणदादा देवतळे यांच्या पुष्पांजली’या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी नंदोरी-मुधोली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
👉 शिवसेना( शिंदे )गटाचे वैभव बोंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
या भेटीचे औचित्य साधून राजकीय घडामोडींनाही वेग आला. आमदार करणदादा देवतळे यांच्या नेतृत्वावर आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे वैभव शेषराव बोंडे यांनी आपल्या समर्थकांसह जाहीर पक्षप्रवेश केला. ना. पंकजाताई मुंडे आणि आ. करणदादा देवतळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
👉 मतदारसंघाच्या प्रश्नांवर मंथन
यावेळी आमदार करणदादा देवतळे यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, पर्यावरणविषयक प्रश्न आणि पशुसंवर्धनाशी संबंधित विविध विषयांवर ना. पंकजाताई मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
👉 महिलांशी संवाद आणि मार्गदर्शन
विशेष म्हणजे, ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांशी आणि स्थानिक महिलांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांनी त्यांना वेळ दिला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले.वरोरा येथील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏 जय विदर्भ 🙏




