वरोरा :-अभिषेक भागडे
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री, लोकनेते स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून वरोरा येथे भव्य ‘नि:शुल्क सर्व रोगनिदान, रक्तदान शिबीर आणि आयुष्मान कार्ड वितरण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. देवतळे यांनी सामाजिक जीवनात गोरगरीब, वंचित आणि गरजू लोकांसाठी केलेले रुग्णसेवेचे कार्य अविरत सुरू राहावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
🟢 शिबिराचे सविस्तर तपशील 🟢
👉 दिनांक :-२५ एप्रिल २०२६
👉 वेळ :- सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत🔵 स्थळ :- उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर 👉 शिबिरामध्ये उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सेवा या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली खालील तपासण्या व उपचार केले जातील:👉 मधुमेह (डायबिटीज), 👉रक्तदाब व हृदयरोग तपासणी व उपचार.👉कर्करोग निदान स्त्रियांच्या स्तनांचे, गर्भाशयाचे व मुखाच्या कर्करोगाचे निदान व उपचार.👉नेत्ररोग मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया.👉 विविध शस्त्रक्रिया👉 हर्निया, हायड्रोशिल, व शरीरावरील गाठींची तपासणी व उपचार.👉अस्थिरोग हाडांशी संबंधित आजारांची तपासणी.👉 निदान चाचण्या ईसीजी व इतर रक्ताच्या विविध तपासण्या व उपचार.🙏शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये 🙏भव्य रक्तदान शिबीर गरजू रुग्णांच्या मदतीसाठी भव्य रक्तदान मोहिमेचे आयोजन.🙏आयुष्मान कार्ड वितरण👉पात्र लाभार्थ्यांना जागीच आयुष्मान कार्डाचे वितरण केले जाईल.👉शासकीय योजना विविध शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती व मार्गदर्शन दिले जाईल.
🙏 विनीत 🙏
श्री. करण संजय देवतळे
(आमदार ७५-वरोरा विधानसभा क्षेत्र)
🙏आयोजक 🙏
स्व. संजय देवतळे मित्र परिवार व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा.
आवाहन 👉 वरोरा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच, उपस्थित राहून स्व. संजयजी देवतळे यांना आपली सामूहिक श्रद्धांजली अर्पण करावी, अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
🙏 जय विदर्भ🙏




