Home राजकारण वणी प्रीमियम लीग’च्या मैदानावर भीमरायांच्या विचारांचा जयघोष मनसे नेते राजू उंबरकर यांच्या...

वणी प्रीमियम लीग’च्या मैदानावर भीमरायांच्या विचारांचा जयघोष मनसे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.

 

वणी :- अभिषेक किशोर भागडे (वरोरा)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच, वणी येथील शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ‘वणी प्रीमियम लीग – मनसे चषक २०२६’ च्या वतीने बाबासाहेबांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. खेळाडूंचा उत्साह आणि भीमरायांच्या विचारांच्या जयघोषात भारलेल्या या वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वणीकरांनी आपल्या लाडक्या उद्धारकर्त्याला मानवंदना दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना उंबरकर म्हणाले की, “केवळ कायदाच नव्हे, तर आयुष्यातील प्रत्येक ‘खेळ’ जिद्दीने आणि चिकाटीने कसा जिंकावा, हे डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातून आपल्याला शिकायला मिळते. त्यांचे विचार हीच आपल्यासाठी खरी प्रेरणा आहे.” यावेळी त्यांनी उपस्थित सर्व खेळाडू आणि वणीकरांना भीम जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
आकाशात रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे भीमजयंतीच्या उत्सवात करण्यात आलेली भव्य फटाक्यांची आतिषबाजी. महामानवाच्या जयंतीचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली, ज्यामुळे वणीचे आकाश उजळून निघाले होते. या जल्लोषाने उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला मनसेचे शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रमेश पेचे मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विलन बोदाडकर, शंकर पिंपळकर, गोविंद थेरे ,लक्की सोमकुवर, शैलेश ढोके, नदीम शेख, मयूर घाटोळे, डॉ. सुलभेवार, अमोल मसेवार गणेश तेलतुंबडे, संस्कार तेलतुंबडे,यांच्यासह मनसे मित्र परिवार, क्रिकेटप्रेमी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय भीम-जय महाराष्ट्र’च्या जयघोषाने संपूर्ण मैदान दुमदुमून गेले होते. खेळाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि महापुरुषांचे विचार जोपासण्याचा हा उपक्रम वणी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

🙏 जय विदर्भ 🙏