राजुरा जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि राजूभाऊ गौरशेट्टीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
राजुरा :- लिलाधर काळे ( गडचांदूर )भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते राजूभाऊ गौरशेट्टीवार यांचा वाढदिवस आज, १४ एप्रिल २०२६ रोजी माजी आमदार संजय धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दुहेरी सोहळ्याच्या निमित्ताने भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळी ठीक १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, राजूभाऊ गौरशेट्टीवार यांचा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला
🙏 प्रमुख उपस्थिती 🙏
या कार्यक्रमाला परिसरातील दिग्गज नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती, ज्यात प्रामुख्याने:
🔴 माजी आमदार संजयभाऊ धोटे
🔴 अविनाश जाधव, अरुण मस्के
🔴 वाघोजी गिराम, राजू डोळे
🔴 जनार्दन निखळे, प्रकाशभाऊ बोनगिरवार
🔴 प्रकाशभाऊ बीजींकवार, तुलारामजी गेडाम
🔴 रवी बुरटकर, महादेवराव तपासे आणि प्रवीण मुसळे
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली, तसेच राजूभाऊ गौरशेट्टीवार यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ आणि ‘राजूभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देत परिसर दणाणून सोडला होता.
🙏 जय विदर्भ 🙏




