Home Breaking News नागपूर पदवीधर मतदारसंघ: भाजपकडून अनिल सोले की सुधाकर कोहळे ? उमेदवारीवर उत्सुकता

नागपूर पदवीधर मतदारसंघ: भाजपकडून अनिल सोले की सुधाकर कोहळे ? उमेदवारीवर उत्सुकता

काँग्रेसच्या अभिजीत वंजारींसमोर भाजपचे आव्हान; निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग

नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावांची चर्चा सुरू असून, पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संभावित उमेदवारांच्या सोशल मीडिया हालचालींनीही वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून जनसंपर्क, भेटीगाठी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून पदवीधर मतदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्मरणिका व गौरवाग्रंथाचे प्रकाशन, शहरातील बॅनर्जी, वृत्तपत्रांमधील जाहिराती तसेच सोशल मीडिया प्रचारातून मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क साधण्यात येत आहे.

महत्त्वाचे उप-मुद्दे व राजकीय घडामोडी:

  • २०२० चा धक्का भाजपसमोर मोठे आव्हान: नागपूर पदवीधर मतदारसंघ हा अनेक दशकांपासून भाजप आणि जनसंघाचा प्रभाव राहिलेला मतदारसंघ आहे. मात्र २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करत हा राजकीय पॅटर्न बदलला. २०२० मध्ये वंजारी यांना ६१,७०१ मते, तर संदीप जोशी यांना ४२,७९१ मते मिळाली, वंजारी यांनी १८,११० मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निकालामुळे १९९८ नंतर प्रथमच भाजप किंवा जनसंघाबाहेरील उमेदवाराने नागपूर पदवीधर मतदारसंघात विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र यापूर्वी लढत कोणत्या उमेदवारांमध्ये होणार, हे अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल.
  • अभिजीत वंजारींची पुन्हा तयारी :- काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांचे नाव सध्या प्रामुख्याने समोर आहे. गेल्या काही काळांत त्यांनी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये जनसंपर्क वाढवण्यावर भर दिल्याचे त्यांच्या कार्यक्रमातून दिसून येते. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा या मतदारसंघात समावेश होतो. पदवीधर मतदारांची नोंदणी आणि संघटननात्मक संपर्क यावरही विविध राजकीय पक्षांकडून भर दिला जात आहे. अभिजीत वंजारींचा पदवीधर मतदारसंघाशी त्यांचा दीर्घ राजकीय संबंध आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव चर्चत असणे महत्त्वाचे मानले जात आहे.
  • नितेश कराड यांचीही एन्ट्री :- या निवडणुकीत तज्ज्ञ व येथील शिक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराड यांचे नावही इच्छुकांमध्ये चर्चेत आहे. त्यांनी यापूर्वीही निवडणूक लढवली असून यंदाही मैदानात उतरण्याची तयारी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपची उमेदवारी, काँग्रेसची रणनीती आणि इतर इच्छुकांची भूमिका यामुळे निवडणुकीचे राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
  • भाजपसमोर उमेदवार निवडीचे आव्हान : एकीकडे दीर्घकाळ मतदारसंघावर प्रभाव असलेल्या भाजपला पुन्हा हा मतदारसंघ मिळवायचा आहे, तर दुसरीकडे २०२० चा विजय कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने संघटननात्मक पातळीवर तयारी सूक्ष्म ठेवली आहे. भाजपमध्ये सोले आणि कोहळे यांच्यापैकी कोणास संधी मिळते, यावर पुढील राजकीय समीकरणाची दिशा निश्चित होणार आहे. उमेदवारांच्या यादीत चर्चेत आहे, त्यामुळे भाजपसमोर सोले आणि कोहळे यांच्यापैकी कोणाची निवड करायची, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेदवाराचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून होणार असल्याने सध्या दोन्ही गटांकडून सुरू असलेल्या हालचालीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात ‘उमेदवारी कोणाला?’ या प्रश्नाबरोबरच २०२० मध्ये काँग्रेसकडे गेलेला हा मतदारसंघ भाजप पुन्हा मिळवणार की काँग्रेस आपला गड कायम ठेवणार, याची उत्सुकता वाढली आहे.