वनी :- लोकशाहीत सामान्य कार्यकर्त्याला संघटना आणि सत्तेच्या चाव्या समजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले. वणी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ‘मातोश्री वारी’ अभियानाचा मुंबईतील टप्पा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.
प्रशासकीय आणि संघटनात्मक प्रशिक्षणावर भर
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी केवळ राजकीय चर्चाच केली नाही, तर प्रशासकीय तांत्रिक बाबी आणि पक्ष संघटनेच्या कामकाजाचे सखोल प्रशिक्षणही घेतले. कार्यकर्त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचे आणि उपक्रमाचे उद्धव ठाकरे यांनी विशेष कौतुक केले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
🔴प्रमुख नेत्यांचे लाभले मार्गदर्शन 🔴
या अभियानाचे नियोजन आणि मार्गदर्शन खासदार अरविंद सावंत , खासदार संजय देशमुख , आमदार संजय देरकर , जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, संजय निखाडे आणि किशोर इंगळे यांनी केले. महिला जिल्हाप्रमुख योगिताताई मोहोड यांनीही महिला आघाडीच्या वतीने मोलाची भूमिका बजावली.
🔴 उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी 🔴
या ऐतिहासिक वारीमध्ये वणी मतदारसंघातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते:
🔴 प्रमुख पदाधिकारी 🔴संतोष माहुरे (संपर्क प्रमुख), शरद ठाकरे (उपजिल्हा प्रमुख), गणपत लेडांगे (जिल्हा संघटक), सुनील कातकडे (विधानसभा प्रमुख), सुधीर थेरे (जिल्हा समन्वयक).
🔴 महिला आघाडी 🔴 डीमनताई टोंगे, गीताताई उपरे, किरणताई देरकर, इंदुताई किन्हेकार, सुरेखा ढेंगळे, ममता पारखी, सविता आवारी.
🔴 स्थानिक स्वराज्य संस्था 🔴नगराध्यक्ष मनीष मस्की, नगरसेवक जितेंद्र नगराळे, अजय धोबे, शेख रंगरेज, अनिकेत बदखल, शत्रुघ्न मालेकर, कांचन देरकर, प्रणाली देऊळकर.
🔴 तालुका व शहर प्रमुख 🔴 सतीश आदेवार, पुरुषोत्तम बुटे, विनोद ढूमने, अभय चौधरी.
🔴 सहकार व युवासेना 🔴संजय देठे (सहकार क्षेत्र), समीर लेनगुळे (युवासेना प्रमुख व्याख्याते), कुंदन टोंगे, मंगेश मोहितकर, विशाल परचाके.
यासोबतच बापूराव लक्षेत्टीवार, सीताराम पिंगे, राजू इद्धे, लुकेश्वर बोबडे, मनीष बत्रा, अजय कवरासे, मोरेश्वर उज्वलकर यांच्यासह जिल्हयातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीमुळे वणी मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




