वरोरा:- स्थानिक लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात ‘प्रतिभा शक्ती विदर्भ प्रांत’ अंतर्गत युवाशक्ती अभियानाच्या वतीने दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महाविद्यालयीन तरुणांना आरोग्याची काळजी, वाढते सायबर अपराध, कायदा आणि व्यक्तित्व विकास यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
🙏मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन 🙏
उद्घाटन प्रसंगी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला साहाय्यक पोलीस अधिकारी लक्ष्मी चौधरी, डॉ. ब्रह्मदत्त पांडे, डॉ. सुरेखा कालकर, डॉ. भावना देशपांडे, डॉ. संपदा नासिरकर, डॉ. मृणालिनी हटवार, ॲड. भावना लोया आणि प्राचार्य राहुल राखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
💥 विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन 💥
👉 मार्गदर्शन करताना लक्ष्मी चौधरी यांनी मोबाईलचे व्यसन, सायबर गुन्हे व पोक्सो कायद्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
👉 प्रा. श्रीकांत पाटील व डॉ. पांडे यांनी मोबाईलचा सकारात्मक वापर करत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून करिअर घडवण्याचा सल्ला दिला.
👉 भावना लोया यांनी विद्यार्थिनींची सुरक्षा, कायदे आणि व्यसनमुक्तीवर प्रकाश टाकला.
👉 डॉ. भावना देशपांडे यांनी ताणतणाव व्यवस्थापन, डॉ. कालकर यांनी करिअर निवड आणि डॉ. संपदा नासिरकर यांनी आरोग्याची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
👉 या सर्व मार्गदर्शक सत्रांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
💥 कार्यक्रमाची सांगता 💥
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. भावना देशपांडे यांनी तर संचालन अनुष्का मैंद यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. मृणालिनी हटवार यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.




