Home Breaking News संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे ‘व्यसनमुक्त विद्यार्थी – व्यसनमुक्त महाराष्ट्र’चा एल्गार;...

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे ‘व्यसनमुक्त विद्यार्थी – व्यसनमुक्त महाराष्ट्र’चा एल्गार; ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची धडक शपथ.

वरोरा :- तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना नशेकडे ढकलणाऱ्या अमली पदार्थांच्या व व्यसनाधीनतेच्या विळख्याविरोधात वरोरा पोलिस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दिनांक १८.०८.२०२६ रोज मंगळवारी  संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे ‘व्यसनमुक्त विद्यार्थी, व्यसनमुक्त महाराष्ट्र’, चंद्रपूर जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष जनजागृती व शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



ठाणेदारांचा थेट संवाद आणि आक्रमक भूमिका 
या कार्यक्रमाला वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. ओमप्रकाश सोनटक्के स्वतः उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट प्रश्न-उत्तरे (Question-Answer) च्या माध्यमातून संवाद साधत व्यसनांचे घातक दुष्परिणाम स्पष्ट केले व आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली.



🙏 मान्यवरांची प्रमुख उपस्थिती व सहभाग 🙏
विद्यालयीन नेतृत्व :- कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेच्या प्राचार्या  रानी पटेल आणि उपप्राचार्या श्रद्धा चौबे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शिक्षक व कर्मचारी वर्ग :- याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
संचालन व आभार :- कार्यक्रमाचे नेटके संचालन आणि आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षिका कोमल चांदेकर यांनी केले.संस्कार भारती पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा आणि ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र’ घडविण्याचा दृढ संकल्प यावेळी घेतला. वरोरा पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील शैक्षणिक वर्तुळात नशेविरोधात एक मोठा संदेश गेला आहे.