वरोरा :- वरोरा तालुक्यातील टेमुर्डा वन क्षेत्रात बोडखा मोकाशी येथे 15 दिवसापासून पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसा अगोदर शेतकरी कुंडलिक कामडी व पशुपालक डोमाजी तुराळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
वनविभाग चे अधिकारी वाघाची दखल घेत नसल्याने, त्यामुळे वाघामुळे भीती पोटी शेतकऱ्यांनी, शेत मजुराणी, पशुपालकांनी थेट स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार प्रतिभाताई धानोरकर व आमदार करणजी देवतळे यांच्या निवासी जण आक्रोश मोर्चा नेला.
स्थानिक लोकप्रतिनिधीनी वनविभाग प्रशासनाला धारेवर धरले.त्यानंतर वनविभाग च्या अधिकारीना जाग आली,वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी बोडखा येथे कॅमेरा लावण्यात आले.
पण पट्टेदार वाघाची संख्या जास्त असल्याने वाघाला पकडण्यात यश आले नाही. आता पर्यंत वनविभाग कडून वाघाला पकडण्यासाठी पिंजऱ्याची सुद्धा जिल्हा स्तरावरून परवानगी मिळाली नाही.
वरोरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी, वनपाल चव्हाण, वनरक्षक माहुलकर यांनी बोडखा क्षेत्र ड्रोन द्वारे व आपल्या उपस्थित वनविभाग च्या पथकला घेउन शेत शिवार पिंजून काढले पण वाघाचा बंदोबस्त काही झाला नाही.
आज वनविभागच पथक बोडखा शेत शिवारात वाघाला पिंजून काढण्याकरीता गेले असता पट्टेदार वाघाने पशुपालक भास्कर मेश्राम व शेतकरी दिलीप थाटे यांच्या शेळ्या व जनावरे चराई करत असताना हल्ला केला.
त्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार झाल्या व एक बैल जखमी झाला.
त्यामुळे येथील शेतकरी, शेत मजूर भयभीत होऊन शेतीवर जाण्यास तयार नाही.
आता हंगाम शेतीचा असल्याने महिला मजुरी साठी जाण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या एक बकरा व गर्भवती शेळीचा स्थळ पंचनामा करण्यात आला.
तसेच दोन्हीही पशुपालकांना आर्थिक मोबदला वनविभाग कडून मिळणार अशे व्यक्तव वनविभाग अधिकारीनी केले.
वनविभाग वरोरा ला सर्व यंत्रणा जिल्हा स्तरावरून देण्यात याव्या व वनविभाग ची पथकची संख्या जास्त वाढवावी अशी गावाकऱ्यांची मागणी आहे.
येत्या दोन दिवसात पट्टे दार वाघाला जेरबंद करावे, वाघा मुळे कोणती जीवितहानी झाली तर बोडखा ग्रामवासियांचा मोर्चा डिव्हिजन फ़ॉरेस्ट ऑफिसर चंद्रपूर येथे धडकणार अशे व्यक्तव संतप्त बोडखा ग्रामवासियांचे आहे.




